म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा
1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा

Loading

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा

भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे चक्रधर स्वामी जयंती व शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली शिक्षकांच्या तासिका विद्यार्थ्यांनी घेतल्या व शिकवण्याचं ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांनी केलं, नंतर दुपारी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.मेढे , मुख्यअतिथी म्हणून शाळेचे सेवानिवृत्त शिक्षके एस.के. जाधव व त्यांच्या पत्नी सौ संध्या जाधव ह्या होत्या तसेच शाळेच्या वरीष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते चक्रधर स्वामी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करूण पुष्प अर्पण करण्यात आले. शाळेच्या वतीने शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. एस.के.जाधव, सौ.संध्या जाधव यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व एस. के. जाधव यांच्या कुटुंबीयांच्या वतीने मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा हात रूमाल( नॅपकिन) नारळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तदनंतर विद्यार्थ्यांनी भाषण केली यात युक्ती मनोज मिश्रा, रोहिणी पासी, शुभम समशेर यांनी भाषण दिली .

 

त्या नंतर शिक्षकांची भाषण झाली यात डॉ.प्रदीप साखरे , श्री एस टी चौधरी, श्रीमती रेखा सोनवणे,
श्रीमती एस एन बनसोडे,
श्रीमती सरला सावकारे, व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सेवानिवृत्त शिक्षक एस. के. जाधव व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस. जी.मेढे.यांनी चक्रधरस्वामी व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवना विषयी चे विचार मांडले. तंत्र स्नेही शिक्षक श्री. एम. एच‌. किरंगे व श्री. निलेश बोराडे, ऑनलाइन लाईव्ह कार्यक्रम दाखवला‌ सर्वांनी लाईव्ह कार्यक्रम बघून आनंद लुटला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या धांडे तर आभार प्रदर्शन डि. के. भंगाळे यांनी केले. कार्यक्रमा नंतर एस के जाधव यांचे कुटुंबाकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले व सर्व शिक्षकांनी भोजनाचा आनंद घेतला. ‌यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *