अमळनेरला प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा
1 min read

अमळनेरला प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा

Loading

‘प्रताप’ मध्ये शिक्षक दिन साजरा
——————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),या ठिकाणी
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त रसायनशास्त्र विभागात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान व शिक्षक दिनाचे महत्त्व बाबत विभागातील माजी जेष्ठ प्रा. डॉ.जयेश आर गुजराथी यांनी तसेच पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थिनी कु. कल्याणी हीने विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले शिक्षकांचे अनन्य साधारण महत्त्व याबाबतचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस फुल व माल्यार्पण करून *शिक्षक दिन* साजरा करण्यात आला.

प्रस्तुत कार्यक्रमास महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.पराग पाटील, माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.पी आर शिरोडे, विभाग प्रमुख प्रा. डॉ.निलेश पवार,
प्रा.डॉ.मिलिंद ठाकरे प्रा.डॉ.तुषार रजाळे, प्रा.संतोष दिपके, डॉ.रवी बाळसकर,प्रा.वैशाली राठोड,डॉ.अमोल मानके, प्रा.हर्षल सराफ व शिक्षकेतर कर्मचारी सुनील बैसाणे, प्रकाश डंबेलकर, जगदीश शिंगणे, लॅब असिस्टंट विवेक तेले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *