शिक्षक दिनी शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी केले अध्यापन
![]()
शिक्षक दिनी शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थी शिक्षकांनी केले अध्यापन
जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात आज गुरूवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय कामकाज सांभाळले.

विद्यार्थ्यांमधून काही निवडक विद्यार्थ्यांनी शिक्षक,शिपाई,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, यांची भूमिका साकारून उत्तम कामकाज केले.या मध्ये एकूण 90विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यांना इ.5 वी चे वर्गशिक्षक श्री.दिलीप गायकवाड सर,सौ.योगिता गवलकर मॅडम,सौ.मनीषा घोलाने मॅडम,श्री.आनंद पाटीलसर ,श्री.मयूर पाटीलसर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेचे पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे सर व शिक्षक दिनानिमित्त बनलेले शालेय पदाधिकारी यांचे हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतीमेस माल्यारपण करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांनी रोजच्या तासिके प्रमाणे वर्गात जाऊन अध्यापन केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे सर, पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप सर,श्री.संजय वानखेडे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.


