विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर
1 min read

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर

Loading

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर

अमळनेर तालुक्याची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न, अमळनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार इच्छुक

अमळनेर प्रतिनिधी- विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली त्यात महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार के.डी बापू पाटील, संदीप घोरपडे,सुलोचना वाघ, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामबापू पाटील आहेत असे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले..
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले..
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी
म्हणजेच पाडळसरे धरण ,बेरोजगारी, महिलांचे सुरक्षीतेचा प्रश्न,जुनी पेंशन योजना, शेतकऱ्यांनी नगदी पिक घेता इतर पिकं सुद्धा घेतली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव अशा
महत्त्वाच्या प्रश्नासाठी विधानसभेची निवडणूक लढवली जाईल असे इच्छुक उमेदवारांनी सांगितले.
पत्रकारांनी प्रश्न विचारला असता काँग्रेस पक्षामध्ये गट आहेत का? काही पदाधिकारी उपस्थित का नाही ?यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की तीन लोक म्हणजे पक्ष नव्हे, आपसामध्ये मतभेद असू शकतात पण हे सर्व बाजूला ठेवून पक्ष हिताला प्राधान्य द्यावे असे सांगत..
उद्या जर काँग्रेस पक्षाने डॉ अनिल शिंदे यांना उमेदवारी दिली तर पक्षाचा आदेश मानून आम्ही महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहू. पण ते तिन्ही पदाधिकारी पक्षाचा प्रोटोकॉल मानत नाही यासंदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर सुद्धा कळविले आहे असे सांगितले..
त्यामुळे पक्षामध्ये कोणतेही प्रकारचे गटतट नाही आहेत असे काँग्रेस पक्षाचे
मनोज पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ ,भागवत सूर्यवंशी ,के.डी पाटील
यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने संभाव्य उमेदवारांना उमेदवारी दिली तर प्रत्येक उमेदवाराने आपले व्हिजन काय असेल ते सांगितले.
सध्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे या महायुती सरकारचे मोठे अपयश आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत सरकार अनेक योजनांचा पाऊस पाडत आहे. एकीकडे सरकारकडे पैसा नाही असे म्हणायचे, राज्यातील कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन करत आहेत. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणार आहेत, हा आमच्या पक्षाचा अजिंठा आहे.
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही, शेतकरी त्रस्त आहेत ,बेरोजगारी वाढली आहे शासनाने किती योजना आणल्या तरीसुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी सांगितले..
देशातील जनता महागाईने त्रस्त आहे, महिला सुरक्षित नाहीत, बेरोजगारी वाढली आहे देशात कायदा व सुव्यवस्था चे तीन तेरा झाले आहेत.. महिलांना पंधराशे रुपये देऊन महायुती विकत घेऊ शकत नाही.. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा मतदार दाखवतील असे काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ यांनी सांगितले.
के.डी बापू काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणाले की मी राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक कामाला प्राधान्य दिले आहे व राजकीय कामात सुद्धा प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क सुरू आहे.. तळागाळातल्या गोरगरीब मुलांना शिक्षणाची सुविधा व्हावी त्यासाठी त्यांना फी मध्येही सवलत देऊन काही मुलांना दत्तक घेऊन समाजसेवा करण्याचा योग येतो याच्यासारखा दुसरा आनंद नाही.. पक्षाने उमेदवारी दिली तर बेरोजगारी, महागाई, शिक्षण क्षेत्रातल्या समस्या कर्मचाऱ्यांच्या समस्या यावर ठोस पावलं उचलेल असे सांगितले..
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची नुकतेच पत्रकार परिषद जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात झाली.
पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष के डी बापू पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी डी पाटील,
काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भागवत सुर्यवंशी,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पाटील , अमळनेर काँग्रेसच्या महीला शहराध्यक्ष प्रा नयना पाटील होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *