महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड
1 min read

महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार -डॉ.इंदू राणी जाखड

Loading

महापालिका क्रीडा क्षेत्रासाठी खेळाडू दत्तक योजना आणि उपक्रम हाती घेणार
-डॉ.इंदू राणी जाखड
—————–
कल्याण( मनिलाल शिंपी):- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी काळामध्ये अनेक योजना आणि उपक्रम हाती घेणार असून त्यामध्ये क्रीडांगण विकसित करणे, क्रीडा संकुल व सर्व मैदानाचे डागडुजी करणे, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाचे कायमस्वरूपी काही उपक्रम चालू करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विचार करून त्यांच्यासाठी काही योजना चालू करणे अशा विविध योजना हाती घेण्याचे डाॅ. इंदु राणी जाखड आयुक्त , कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे महानगरपालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण अमलात आणून महापालिकेत मंजूर करून घेणे यावर आम्ही विचार करत असून त्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आपण नक्कीच महापालिकेचे क्रीडा धोरण अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन आयुक्तांनी क्रीडा शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात
अविनाश ओंबासे (सदस्य-राज्य क्रीडा धोरण समिती महाराष्ट्र शासन), अंकुर आहेर (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी), प्रा. लक्ष्मण इंगळे (अध्यक्ष, कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ),
सुप्रिया नायकर (प्राचार्या, ग्लोबल कॉलेज, डोंबिवली) संतोष पाठक
(उपाध्यक्ष, राज्य क्रीडा संघर्ष समिती),
प्रताप पगार (राज्य सचिव, रोल बॉल संघटना) यांचा समावेश होता.
या चर्चेदरम्यान मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व नागपूर या महानगरपालिकां मध्ये ज्या धर्तीवर क्रीडा विकासाच्या योजना व उपक्रम राबविण्यात येतात तसे उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ही राबविले जावेत, महापालिकेतील क्रीडासंबंधी आरक्षित भूखंड हे शासनमान्य एकविध क्रीडा संघटनांना दिल्यास क्रीडांगणांची देखभाल व्यवस्थित राहील व खेळाडूंना फायदा होईल, शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करताना स्पर्धेचा दर्जा उंचावेल आणि खेळाडूंना चागल्या सुविधा कशा देता येतील व खेळाडूंना मानबिंदू म्हणून स्पर्धा आयोजित झाल्या पाहिजे, सध्या मुलींना होणारे अत्याचार आणि बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांसाठी महापालिकेच्या वतीने मार्शल आर्ट सारखे उपक्रम चालू करून महिलांची सुरक्षा कशी शेफ असेल हे पाहावे, महानगरपालिका शाळांमधील होतकरू खेळाडूंना दत्तक योजना आखली जाणे काळाजी गरज आहे. महानगर पालिकेतील क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यासाठी सक्षम क्रीडा अधिकारी असणे आवश्यक आहे. असे सर्व मुद्दे चर्चेला घेण्यात आले. या बैठकीदरम्यान महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे, उपायुक्त रमेश मिसाळ, मा. शिक्षण व क्रीडा विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर साहेब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *