राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई करा ,अमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन,
व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई कराअमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
राजकोट तालुका मालवण येथील आठ महिन्यापूर्वी उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किरकोळ वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात सुद्धा ठेकेदाराने अक्षम्य असे दुर्लक्ष केले व संबंधित मंत्र्यांनी सुद्धा त्यात कमिशन खाल्ले म्हणून 2 कोटी 68 लाख रुपये खर्च करून उभारलेला पुतळा आठ महिन्यातच कोसळला तरी संबंधित खात्यांच्या मंत्र्यावर व त्या ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी अमळनेर येथे शिवप्रेमींनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली.
निवेदन देते प्रसंगी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त तथा पदाधिकारी डॉ अनिल शिंदे, धनगर दला पाटील, निळकंठ पाटील,मा.नगरसेवक महेश पाटील,प्रा.अशोक पवार,
प्रवीण जैन, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, अशोक पाटील, रामकृष्ण पाटील सह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते
तहसीलदार यांना निवेदन देताना प्रा. सुभाष पाटील डॉ अनिल शिंदे व शिवप्रेमी


