महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे
![]()
महाराष्ट्र राज्य विधान परिषद शताब्दी महोत्सव अनोखा ठरणार! डाँक्टर नीलम गोऱ्हे
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रात विधानपरिषदने देशात एक आगळी वेगळी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. देशातील अनेक पातळ्यांवर नेतृत्व देणारे नेते महाराष्ट्र विधान परिषदेतून घडले आहेत. या नेत्यांनी संसदीय लोकशाही मजबूत केली. अशा या महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव साजरा होत आहे याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन डाँक्टर नीलम गोऱ्हे यांनी केले. महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा अनोखा सोहळा साजरा होणार आहे हे आमचे सोभाग्य आहे.
मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांना आज दि.२९ ॲागस्ट २०२४ रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी दिले.

