रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची सुधाशांती..
1 min read

रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची सुधाशांती..

Loading

रोटरी क्लब, अमळनेर तर्फे रेल्वेच्या २००० गरजू प्रवाशांची सुधाशांती..

अमळनेर प्रतिनिधी
गुजरात येथे बहुतेक ठिकाणी अत्रिवृष्टी मुळे गुजरात मध्ये रेल्वे सेवा विस्कळित झाल्यामुळे,ता.२८/०८/२०२४ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकावर
बराऊनी-अहमदाबाद एक्स्प्रेस ला ५ तासानं साठी अमळनेर स्थानकावर थांबून राहावे लागले,यात लहान मूल, वृध्द महिला प्रवासी व कामगार वर्ग असे १५००-२००० प्रवासी असताना यांचे जेवणाचे हाल होतायेत असे CMI पांडे साहेब यांना कळल्यास, त्यांनी रोटरियन व रेल्वे स्थानिक सलागर समिती चे रो. प्रित्पाल बग्गा यांना कळवले असता, प्रवाशांची गैरसोय व हाल बघता रोटरी ची तत्काळ मीटिंग बोलावून सुमारे २००० प्रवाशांसाठी अन्न व RO पाण्याची सोय करण्यात आली.
सदर वाटप व व्यवस्थेसाठी रोटरी प्रेसिडेंट ताहा बुकवाला,रोटरी मेंबर सुहास राणे, चेलाराम सेनानी,रोहित संघवी,सौरभ जैन,वृशब पारख,किशोर लुल्ला,ईश्वर सेनानी, रौनक संकलेचा,प्रतीक जैन असे सदस्य यांनी परिश्रम घेतले व
स्टेशन अधीक्षक शिंदे साहेब, स्टेशन ट्रॅफिक निरीक्षक सिंह साहेब व RPF स्टाफ, लाईनमन स्टाफ व काही इतर जुने रेल्वे कमिटी मेंबर यांनी देखील वाटप व व्यवस्थेसाठी मदत करून, रेल्वे ला आणि गरजू प्रसावस्याना होत असलेली रोटरी ची मदत कौतुकास्पद असल्यास समाधान व्यक्त केले व प्रवाशांची सोय झाल्याचा समाधान त्यांच्या मार्फत व्यक्त झाल्यास, रोटरी प्रेसिडेंट रो.ताहा बुकवाला यांनी रोटरी मार्फत अश्या सेवा होत असल्याचा समाधान असतो असे कळवून रेल्वे प्रशासन व स्टाफच्या मदतीसाठी आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *