नाराणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “करुणा क्लब” च्या वतीने दहीहंडी कार्यक्रम संपन्न..
![]()
नाराणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “करुणा क्लब” च्या वतीने दहीहंडी कार्यक्रम संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी-अंतर्गत दरवर्षीप्रमाणे..श्री क्रुष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला..सुरवातीला सर्व शालेय गोविंदानी डी.जे च्या तालावर ठेका धरला व कार्यक्रमाला सुरुवात झाली या दहीहंडी चे खास वैशिष्ट्य म्हणजे… मुलींच्या गोविंदा पथकाने सुद्धा तीन मानवी मनोरे तयार करून दहीहंडीफोडण्यासाठी छान प्रयत्न केले… शेवटी मुलांच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली व गोविंदा पथकाने मोठा जल्लोष साजरा केला… अशा रीतीने दहीहंडी चा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यावेळी राधा-क्रुष्णाची भुमिका सुद्धा साकरण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी बांधवांचे मनापासून सहकार्य लाभले…

