२५ तारखेला राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन
![]()
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेसाठी बैठकीचे आयोजन
………………………………………
जयभीम🙏जय संविधान
एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, चोपडा व धरणगाव तालुक्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीतील बंधू-भगिनींना सुचित करण्यात येते की एरंडोल येथे लवकरच *राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे* आयोजन करण्यात येत आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्याकरिता व जळगाव पश्चिम विभागाच्या समित्या नियुक्त करण्या करीता महत्वपूर्ण बैठक *दि.25/08/2024 रोजी हिमालय कॉम्प्लेक्स हॉल एरंडोल* (बस स्टँड जवळ) या ठिकाणी दुपारी *एक वाजता* आयोजित करण्यात आली आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी व सुरक्षेसाठी काळाची पावलं ओळखून आम्हा सर्वांनी एकत्रितरित्या भरीव प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आज हे आमच्या लक्षात नाही आले तर उद्या उशीर झालेला असेल. जाणीव असणाऱ्या सर्व बंधू-भगिनींना हृदयापासून उपस्थितीचे भावनिक आवाहन करण्यात येत आहे.

