भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ
![]()
भुसावळ तालुका शालेय खो खो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी खेळा- राहुल वाघ
भुसावळ प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी पब्लिक स्कूल द्वारा आयोजित शालेय 14,17,19वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या उद्घाटन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष,डॉ. प्रदीप साखरे . शाळेचे प्राचार्य रुद्र सेन , सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव संगीता जगताप, ओझरखेडा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत , तांत्रिक समिती सदस्य विलास पाटील, लक्ष्मीकांत नेमाडे, यांच्यासह शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व स्पर्धेचे उद्घाटक राहुल वाघ यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन व श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना खेळाडूंनी खेळ हा करिअरसाठी खेळावा खेळामध्ये आपल्याला करिअर घडवता येते खेळामधूनच आपल्याला पाच टक्के आरक्षण मिळवून नोकऱ्या मिळवता येतात पोलीस अधिकारी व उच्च अधिकारी सुद्धा क्रीडा कोट्यातून आपल्याला बनता येते मुलींनी शारीरिक सुदृढ बनण्यासाठी खेळ खेळला पाहिजे. असे मत आपल्या मनोगत व्यक्त केले. व विद्यार्थिनींना खो खो खेळाविषयी पाच प्रश्न विचारले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
14 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक श्रीकृष्ण हायस्कूल शिंदी, द्वितीय माध्यमिक विद्यालय ओझरखेडा, उ .व तृतीय महात्मा गांधी विद्यालय वरणगाव, यांनी पटकाविले
17 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक. महर्षी व्यास विद्यालय वेल्हाळे , व द्वितीय क्रमांक अरुणोदय माध्यमिक विद्यालय बोहर्डी ,मिळवला. तृतीय स्थान श्रीकृष्णा स्कूल शिंदी यांनी
19 वर्ष वयोगट त्यात प्रथम क्रमांक बियाणी जुनिअर कॉलेज भुसावळ. संघ हे विजयी झाले. पंच म्हणून नरेंद्र मस्के, विलास पाटील, सुनील चौधरी, पराग पाटील, ललित फेगडे, वाणी सर, निलेश राजपूत, रुपेश मोरे, इसुफ खान अनिल महाजन, आदींनी काम पाहिले
स्पर्धा यशस्वीतेसाठी रुद्र सेन तालुका क्रीडा समन्वय डॉ. प्रदीप साखरे तांत्रिक समिती सदस्य विलास पाटील, लक्ष्मीकांत नेमाडे. श्री मेघश्याम शिंदे व नरेंद्र मस्के यांच्यासह बियाणे स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


