महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…
1 min read

महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…

Loading

महाराष्ट्र बंद च्या धर्तीवर शनिवारी धरणगाव बंद…

धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील

धरणगाव — पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या तसेच संत महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत लेकी बाळींवर होत असलेल्या विकृत तसेच अमानवी घटनांच्या निषेधार्थ उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. याच धर्तीवर उद्या धरणगाव शहरातील सर्व व्यापारी बंधू तसेच लहान मोठे व्यावसायिक यांनी देखील या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे. आपल्या लेकींच्या भवितव्यासाठी आपण या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महाविकास आघाडी धरणगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *