कवी गीतेश गजानन शिंदे यांना राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्यपुरस्कार प्रदान!
1 min read

कवी गीतेश गजानन शिंदे यांना राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्यपुरस्कार प्रदान!

Loading

कवी गीतेश गजानन शिंदे यांना
राज्यस्तरीय स्मृतीशेष चमेलीभाऊराव काव्यपुरस्कार प्रदान!
—————————————-

ठाणे प्रतिनिधी-
स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे राज्यस्तरीय
2023 साठीचे उत्कृष्ट कविता संग्रह आणि उत्कृष्ट कादंबरीसाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते.५०००/-रूपये रोख रक्कम , स्मृती चिन्ह, आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्लरूप होते.५८कविता संग्रह आणि१५कादंबरीचे राज्यभरातून पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते.निवड समितीने कादंबरीसाठी पुणे येथील दैवा झिंजाड यांच्या “एक भाकर तिन चुल्ही” न्यु ईरा प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या कादंबरीची निवड केली तर कवितेसाठी गीतेश गजानन शिंदे यांच्या सीसी टि.व्हींच्य गर्द छायेत या शब्दालय प्रकाशन शेवगाव जि.नगर यांनी प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाची निवड केली.पुरस्काराची रोख रक्कम तात्काळ संबधितांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.पुरस्कार आपल्या दारी या अभिनव संकल्पनेतून हे पुरस्कार वितरण कवी/लेखकाच्या गावी/घरी जाऊन वितरीत करण्याचा संकल्प असल्याने देवा झिंजाड यांचा पुरस्कार पुणे येथील बालभारतीचे संचालक श्री. कृष्णा पाटील यांचे शुभहस्ते यापूर्वीच वितरीत करण्यात आलाय.आज दि.23/8/24 रोजी ठाणे येथे कवी गीतेश गजानन शिंदे यांचे घरी सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका प्रज्ञा दया पवार यांचे शुभहस्ते कवींच्या आई-वडिलांच्या उपस्थिती सन्मानपूर्वक कवी गीतेश शिंदे यांना वितरीत करण्यात आला.प्रास्ताविक शशिकांत हिंगोणेकर याःनी पुरस्कारी भूमिका स्पष्ट करून निरपेक्ष भावनेतून अस्सल कला कृतीला हे पुरस्कार देण्यात आलेले असल्याचे सांगितले.कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी हे पुरस्कार घरापर्यंत येऊन दिले जात असल्याचे स्वागत आणि अभिनंदन केले.गीतेश गजानन शिंदे यांची कविता अंतर्बाह्य संवेदनेचे नवे वर्तमानकालीन संवेदन असल्याचे सांगून कवी शिंदे यांचे प्रेरक अभिनंदनही केले.या प्रसंगी कवी शिंदे यांनी मनोगतात या पुरस्काराने कवितेची प्रतिष्ठानने घेतलेली दखल ही प्रेरणादायी आहे. आईवडिलांचे उपस्थितीत घरी हा पुरस्कार स्वीकारताना ते सदगतीत होऊन भावनिक झाले होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभारप्रदर्शन ठाण्याच्य सर्जनशील कवयित्री सुजाता राऊत याःनी केले.गीतेश गजानन शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *