अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार
![]()
अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा उपलब्ध होणार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर रेल्वे स्टेशनवर 3 वर्ष पासून पार्सल सुविधा बंद आहे.अमळनेर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मागणी केल्यामुळे रेल्वेस्टेशन वर पार्सल सुविधा सुरू करण्यात येत आहे.
याबाबत नुकतीच रेल्वे सल्लागार समिती मार्फत व्यापाऱ्यांना आवाहन केले गेले होते की किती प्रमाणात व कोणकोणते पार्सल या अमळनेर रेल्वे स्थानकावरून,,पार्सल होणार आहेत ते कळवावे. याला शेतकरी,व व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद,मिळाला त्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून आज 22 ऑगस्ट रोजी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यां कडून निवेदन देण्यात आले या वर सकारात्मक चर्चा झाली
व लवकरात लवकर पार्सल सुविधा सुरू होऊन नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे या वेळी अमळनेर रेल्वे स्थानकाचे रवी जी पांडे-अधीक्षक वाणिज्य विभाग,
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कंखरे डॉ.संजय शाहा, किर्तीलाल पाटील, निर्मल कुमार कोचर, राहुल किशोर पाटील आदी उपस्थित होते

