सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन..
1 min read

सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन..

Loading

सानेगुरुजी विद्यालयात साथी गुलाबबापू यांना प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने अभिवादन..

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन अभिवादन करून साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंतराव पाटील, एडवोकेट अशोक बाविस्कर, डॉ यशवंतराव देशमुख, अमृत पाटील, भास्करराव बोरसे, ए जे शेख, किरण पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, चव्हाण मॅडम आदी उपस्थित होते.
माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख यांनी स्वर्गीय साथी गुलाबराव पाटील यांच्या जीवन कार्याविषयी विषयी माहिती विद्यार्थी व उपस्थितांना दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली ने बापूसाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली गेली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांनी केले.
बापूंनी शाळा काढून अनेक पालकांना शैक्षणिकदृष्ट्या आधार दिला. तसेच आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण तालुक्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *