राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन
![]()
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेल तर्फे अवकाश जागरूकता संवाद
जयदीप पाटील यांचे इस्रो:काल-आज आणि उद्या विषयावर कार्यशाळांचे आयोजन
जळगांव प्रतिनिधी
चंद्रयान 3 च्या यशानिमित्त दिनांक 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे जिल्ह्यात अवकाश जागरूकता संवादाचे आयोजन शाळा व महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेले आहे. या अंतर्गत इस्रो मॅन म्हणून परिचित असलेले तसेच आजपर्यंत साडेसहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना इस्रो भेट घडवून आणणारे नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांची” इस्रो: काल आज आणि उद्या”या विषयावर 14 शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्याने व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेले आहे.अवकाश जागरूकता संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल येथे लता मंगेशकर सभागृह येथे संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार
, शाळेच्या मुख्याध्यापिका सीता तिवारी उपस्थित राहणार आहेत. सदर अवकाश संवाद कार्यक्रम 23 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान एटी झांबरे विद्यालय जळगाव ,स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, साने गुरुजी विद्यालय अमळनेर, विजय नाना पाटील आर्मी स्कूल अमळनेर ,पी आर हायस्कूल धरणगाव,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव, आय एम आर कॉलेज जळगाव ,अंजनी ग्रुप विद्यालय हिंगोणे बुद्रुक येथे व्याख्याने व कार्यशाळांच्या आयोजन करण्यात आलेले आहे .सदर सप्ताहाचा समारोप रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे असे संस्थेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे.

