मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न
1 min read

मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न

Loading

मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पुरक राखी बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक चा वापर न करता पुर्णपणे ईको फ्रेंडली राख्या बनविल्या. नंतर प्रदर्शन भरवून सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर बांधवांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचा रक्षाबंधनासाठी उपयोग केला. एक वेगळी संकल्पना म्हणून *एक राखी झाडासाठी उपक्रमातून *पर्यावरण संरक्षण करण्यासाठी संदेश देण्यात आला… या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद व अनुभव घेतला व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.. संस्थेचे चेअरमन प्रकाश मुंदडा तसेच शाळेतील मुख्याध्यापक यांनी व शिक्षक ,शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक केले व शाबासकी दिली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *