म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा.
1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा.

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे रक्षाबंधन सण साजरा.

भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे भाऊ बहिणींचा पवित्र रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांनी रक्षाबंधन सणा विषयी माहिती दिली. राखी एक धागा नसून तो रक्षणाचे व बहिण भावाच्याप्रति एकमेकांवर असलेला विश्वास व प्रेमाचे प्रतीक आहे ‌विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थीनीं आपल्या बहिणी आहेत व विद्यार्थिनींनी शाळेतील सर्व विद्यार्थी आपले बंधू आहे या भावनेने वागावे व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनींचे रक्षण करावे व एकमेकांविषयी जातीय सलोखा व प्रेमभाव ठेवावा. असे मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ‌प्रदिप साखरे यांनी केले. आभार प्रदर्शन एस.टी. चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.के. भंगाळे , एन. एच. राठोड, एस. एन. बनसोडे ,जे.पी. शिरतुरे , आर.पी. सोनवणे, संध्या धांडे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *