ड्रायव्हरच्या मुलाची एसआरपीत निवड ; ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार
1 min read

ड्रायव्हरच्या मुलाची एसआरपीत निवड ; ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार

Loading

 ड्रायव्हरच्या मुलाची एसआरपीत निवड -ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार

कापडणे :- येथील ट्रक ड्रायव्हर तुकाराम नामदेव माळी यांचा मुलगा प्रतीक याची एस आर पी त निवड झाली त्याने गुणवत्ता यादीत धुळे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला.निवड झाल्यानंतर प्रतीकची संपूर्ण गावभर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर नागरी सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रतीकचे वडील तुकाराम माळी यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी माजी कृषी सभापती श्री. बापूसाहेब खलाणे यांनी मार्गदर्शन करीत इतर युवकांनी प्रत्येक कडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.अतिशय सामान्य परिस्थिती असताना देखील आपल्या जिद्दीच्या बळावर एसआरपीत निवड झालेल्या प्रतीकचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
श्री संत सावता महाराज मंदिर येथे माजी कृषी सभापती बापूसाहेब खलाणे सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वासराव माळी,लक्ष्मण माळी, जीवराम महाराज, शिवराज माळी,विठोबा झुलाल माळी,संजय माळी, सुशील माळी,प्रकाश माळी,ज्ञानेश्वर माळी, लाला माळी, भीमराव माळी,देवेंद्र माळी, महेंद्र माळी, रवींद्र माळी, देविदास माळी,नारायण माळी, दादा माळी,भरत माळी,देवेश माळी, दादू देवरे, सुमित माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *