म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दरवर्षाप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थिनी. पूर्वाश्रमीच्या (रेखा भंगाळे) स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पति सुधाकर नारखेडे यांच्यातर्फे इयत्ता दहावी मध्ये बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते यावर्षी सुद्धा, ये 2023 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्वाती सोनवणे हिला १५०१ , द्वितीय क्रमांक मिळालेल्या गायत्री मतलानेव प्रतीमा पारधे यांना प्रत्येकी ११०१ रु चा चेक देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे . हे होते . सदर प्रसंगी जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालीनी बनसोडे , जेष्ठ क्रीडा शिक्षिक डॉ . प्रदीप साखरे, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. प्रदिप साखरे यांनी सुधाकर नारखेडे हे एसटी डेपोत होते. स्वतःच्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत एक मार्कामुळे बोर्डाच्या यादीत नाव न लागल्यामुळे. शिक्षणात मार्कांना किती महत्त्व आहें हे जाणून परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रेम व विद्यार्थ्यांनी पुढे जावे ही असलेली त्याच्या मनातील भावना यामुळे ते दरवर्षी विद्यार्थ्यांना आपल्या स्वर्गीय पत्नीच्या नावे रोख बक्षीस देत असतात. त्याबद्दल त्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा व हे बक्षीस आपल्याला कसे मिळवता येईल याचा प्रयत्न करावा असे आव्हान विद्यार्थ्यांना केले व 95% च्या वरती जेवढे विद्यार्थी गुण मिळवतील त्यांना 5001 रुपये शाळेच्या वतीने देऊन गौरवण्यात येईल असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापकमेढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त अभ्यास करा ध्येय निश्चित करा व त्या ध्येयावरती मार्गक्रमण करा यश तुमचीच आहे तुम्हाला सुद्धा असे बक्षीस मिळवता येतील त्यासाठी आपण जास्तीत जास्त अभ्यास करावा व रोज शाळेत उपस्थित राहावे असे आव्हान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाना पाटील यांनी केले.

