नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.
1 min read

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.

Loading

नाशिक मंडळ उपसंचालक,सहा.संचालक यांचे हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुण गौरव.

जळगांव प्रतिनिधी

नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने आरोग्य सेवा उपसंचालक डाॅ.कपिल आहेर, व सहा.संचालक आ.से. (हिवताप) डाॅ. विवेक खतगांवकर, नाशिक या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते.. ग्रामीण भागातील जनतेला उत्कृष्ट सेवा देऊन कर्तव्य बजवल्याबद्दल… जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-फत्तेपुर ता-जामनेर येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती मनिषा वाकोडे,
तसेच..
प्राथमिक आरोग्य केंद्र-धामणगाव, ता-जळगांव येथील आरोग्य सेवक-निलेश पाटील यांना सन २०२३-२४ साठी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

त्याबद्दल जिल्ह्याभरातून श्रीमती मनिषा वाकोडे व निलेश पाटील यांचेवर अभिनंदनाचा तथा शुभेच्छांचा वर्षांव केला जात आहे.
श्रीमती वाकोडे व श्री निलेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की..
सदरचा पुरस्कार हा जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर साहेब आणि जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख साहेब, व सर्व अधिकारी, सहकारी यांचे वेळोवेळी मिळणारे मोलाचे मार्गदर्शनाने आम्हीं या सन्मानास पात्र ठरलो आहोत, त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *