सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा.
![]()
सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा.
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातील माजी सैनिक रत्नाकर भोळे,गोपाळ भोळे व गावातील शेतकरी पुरुषोत्तम सावदेकर,नितीन पाटील, अतुल चौधरी, किशोर नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले. या सर्वांना शाळेतील विद्यार्थिनी कोमल नारखेडे, मोहिनी पाटील, कुंदना सोनवणे, साक्षी चौधरी, स्वाती कुंभार,सानिया चौधरी,दीक्षा सोनवणे,शुभांगी कोळी यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या बांधल्या. इयत्ता सहावी अ चा विद्यार्थी छायेश पाटील याने रक्षाबंधन सणाचे महत्त्व सांगितले.याप्रसंगी माजी सैनिक गोपाळ भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल यांनी बहिण भावाच्या अतूट नात्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर शाळेचे पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना महाजन चौधरी,प्रास्ताविक डी.जी.महाजन तर आभार वृषाली चौधरी यांनी मानले.

