एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा *खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!* ….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन
![]()
एससी एसटी उपवर्गीकरण निकाला विरोधात जाहीर मेळावा
*खबरदार ! अनु.जाती-जमाती उपवर्गीकरण कराल,तर याद राखा..!!*
….प्रा.डाॅ.इंदिरा आठवले यांचे प्रतिपादन
जळगाव आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरण व क्रिमिलेरच्या दिलेल्या निकालाच्या विरोधात एससी एसटी समूहाचा जाहीर मेळावा अजिंठा हौसिंग सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला. या जाहीर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील सामाजिक चळवळीच्या अभ्यासिका प्रा. डॉ.इंदिरा आठवले, आंबेडकरवादी साहित्यिक आयुष्यमान सुरेश साबळे,मुकुंद सपकाळे,डॉ.मिलिंद बागुल,जयसिंग वाघ,प्रा.डॉ.सत्यजित साळवे,दिलीप सपकाळे,डॉ.उल्हास तासखेडकर,सरोजिनी लभाणे हे विचार मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी भूषवले कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रमुख मार्गदर्शिका प्रा.डॉ. इंदिरा आठवले यांच्या हस्ते जाहीर मेळाव्याचे उद्घाटन प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक चळवळीचा अभ्यासक तथा विचारवंत प्रा. डॉ. इंदिरा आठवले यांनी एससी एसटी उपकरणाचा निकाल कशा पद्धतीने समाजापर्यंत पोहोचला संवाद संविधान विरोधी निकालाचा त्यांनी सुरुवातीपासून मागोवा घेत न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी मांडलेल्या सदर निकालाच्या विरोधातील मत अतिशय गंभीर असून ते आपण सर्वांनी अभ्यासले पाहिजे बेला त्रिवेदी यांचे मत हेच फक्त संविधानाला धरून असून इतर सहा न्यायाधीशांनी दिलेला निकाल प्रलोभनांना बळी पडून दिलेला आहे असे स्पष्ट आणि परखड मत मांडले. यांना कारक निकालाच्या विरोधात एससी एसटी समाजाला रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नाही रिडल्सचा मोर्चा ज्या पद्धतीने मुंबई नगरीमध्ये निघाला होता त्याच विराट पद्धतीने राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलने निदर्शने आणि मोर्चे निघाले पाहिजे हा अतिशय घातक असा निकाल आहे त्यामुळे एकजींशी असणाऱ्या एस.सी. एस.टी. समूहाला फोटो काढून त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचे काम आणि द्वेष निर्माण करण्याचे काम राज्य व केंद्र सरकारने सत्ताधीश राज्य व केंद्र सरकारने सत्ताधीश करताना दिसत आहे यासाठी जे जे एस. सी., एस. टी. संवर्गाचे लाभार्थी आहेत त्यांना आता रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही आपला लढा आता आपल्याला चढावा लागेल आणि त्यासाठी घरात बसून चालणार नाही नाहीतर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही असे स्पष्ट मत मांडत त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या मार्गदर्शक मार्गदर्शना मधून अंतर्मुख केले.
सर्व जातीसमूहांना शिक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे त्यांनी आधी शिक्षण घेतले पाहिजे समुदायांमध्ये जाती परंपरागत धंद्यामध्ये गुतलेले असल्यामुळे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले खेडे सोडा आणि शहरीकरणाच्या वातावरणात या असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याबरोबर बौद्ध समाजाने खेडी सोडले आणि शहराकडे मार्गक्रमण केले. गाव खेड्यामध्ये महार समाज कोतवालीचा काम करत होता पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण घ्या आणि शिक्षण सोडून हा समाज जागृत झाला त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आपण एक गुलामी आता सोडले पाहिजे असा निश्चय करून शहरांमध्ये ही परिस्थिती स्थळ झाली जेमतेम पहिली पिढी स्थिरतावर होत नाही तोपर्यंतच सत्ताधीशांनी उपवर्गीकरणाचा डाव टाकला आणि एस.सी. असणाऱ्या एस.टी. असणाऱ्या एकजींशी समूहाला वेगळे करण्याचे कटकारस्थान आणि रचले आहे असे स्पष्ट प्रतिपादन आंबेडकर चळवळीचे अभ्यासक आयुष्यमान सुरेश साबळे(बुलढाणा) यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आरक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी आंदोलन उभे करण्यासाठी लागणारी शक्ती आता गावोगाव खेडोपाडी जाऊन उभी करण्याची गरज आहे काळ मोठा कठीण आला आहे आणि या काळाला उत्तर देण्यासाठी आणि व्यवस्थेला वतनीवर आणण्यासाठी आपला प्रभाव आणि दबाव निर्माण झाल्याशिवाय निर्माण झाल्याशिवाय केंद्राच्या आणि राज्यातले सरकार माघार घेणार नाही येथे निवडणुकीतून येत्या निवडणुकीतून उन्मत्त सत्ताधीशांना वाटणीवर आणावे लागेल उप वर्गीकरण आयोग नेमणाऱ्या राज्य सरकारला याची मोठी किंमत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोजावीच लागेल असा इशारा सपकाळे यांनी दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी केले परिचय प्रा. प्रीतीलाल पवार यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले तर आभार कैलास तायडे यांनी मानले.

