वंजारी महासंघ पुरस्कृत अहिल्यानगर येथे दुसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात प्रतिभावंतांचा गौरव
![]()
वंजारी महासंघ पुरस्कृत अहिल्यानगर येथे दुसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात प्रतिभावंतांचा गौरव
संत सद्गुरू अवजीनाथ महाराज संत सद्गुरू वामन भाऊ महाराज संत सद्गुरू जगद्विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार समाजसुधारक राष्ट्र संत भगवानबाबा भागवत धर्म वैश्विक पातळीवर पोहचवणारे सद्गुरू ह भ प डॉ नामदेव शास्त्री महाराज भगवानगड ह भ प विठ्ठल महाराज गहिनीनाथ यांच्या कृपा आशिर्वादाने अहिल्या नगर या ठिकाणी होणाऱ्या या अभुतपुर्व ऐतिहासिक सोहळ्यात अनेक साहित्य क्षेत्रातील दिग्गज ज्यांच्या कार्याचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटला आहे त्यांना *जगद्विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार समाजसुधारक राष्ट्र संत भगवानबाबा साहित्य रत्न पुरस्कार 2024* देऊन दिनांक 25,/8/2024रविवार गंगा लान्स संत भगवानबाबा चौक निर्मल नगर अहिल्या नगर अहमदनगर येथे गौरविण्यात येणार. त्या अनुषंगाने सत्कारमूर्ती यांच्या नावाची घोषणा वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवन्त तथा साहित्यिक मा.गणेश खाडे यांनी एका पत्रकान्वये केलीय.
सदर पुरस्कार कथा,कविता व समीक्षा या साहित्य प्रकारात दमदार वाटचाल व साधना करणाऱ्या समाजातील प्रतिभावंतांना देण्यात आला असून संमेलन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा महासंघाचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या नावाचा निर्देश पुढील प्रमाणे केला आहे.
१)प्रा.डॉ.शिवाजीराव हुसे- छ.संभाजीनगर
२)प्रा.डॉ. शिवाजीराव नागरे- अकोला
३)प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये- परभणी
४)श्री.चंद्रकांत धस-पुणे
५)श्रीमती रेखा शेळके संखे-मुंबई
६)प्रा.डॉ. रामकिशन दहिफळे-छ.संभाजीनगर
७)प्रा.डॉ.द्वारका मुंडे-नांदुरघाट जि. बीड
८)श्रीमती रंजना सानप-मायणी जि. सातारा
९)श्री.सोपान हळमकर-बीड
१०)श्री.मनोहर आंधळे -चाळीसगाव जि. जळगाव
११)श्री.तुळशीराम बोबडे -अकोला
१२)श्रीमती अलकनंदा घुगे आंधळे -छ.संभाजीनगर
१३)श्री.रमेश आव्हाड-नाशिक
१४)श्रीमती प्रीती बेटकर-पुणे
१५)श्रीमती जयश्री वाघ-नाशिक
१६)श्रीमती छाया वाघ जायभाये-जालना
सर्व पुरस्कारार्थींचे वंजारी महासंघ पदाधिकाऱ्यांच्यावतीने व निवड समितीच्यावतीने अभिनंदन. सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागत अध्यक्ष तथा अंतरराष्ट्रीय कुस्ती पटू राजकुमार आघाव सह स्वागत अध्यक्ष रेणुकताई वराडे सह स्वागत अध्यक्ष घनश्याम बोडखे निमंत्रक मल्हारी खेडकर जिल्हा अध्यक्ष अहिल्या नगर युवक जिल्हाध्यक्ष अर्जुन वायभासे हे प्रयत्नशील आहेत.

