कल्याण येथे आर एस पी युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
कल्याण येथे आर एस पी युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न

कल्याण डोंबिवली परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, व वाहनचालकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे सहकार्य मोलाचे आहे: सचिन सांडभोर.*
*कल्याण डोंबिवली विभागातील आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे: विजय सरकटे*
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत अध्यक्ष संजय शेंडे उपाध्यक्ष पितांबर महाजन महासमादेशक अनिल शेजाळे महाराष्ट्र उपाध्यक्ष हिराजी पाटील यांच्या , कल्याण- डोंबिवली नेतृत्वाखाली उल्हासनगर,भिवंडी-निजामपूर, अंबरनाथ बदलापूर विभागातील महानगरपालिका, नगरपालिका, परिसरातील
आर एस पी अधिकारी शिक्षक यांची सत्र शुभारंभ सभा दिनांक :- 16/8/ 24 वार शुक्रवार रोजी कल्याण येथील आर्ट गॅलरी वायले नगर खडकपाडा कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. मा. पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड साहेब व सह पोलीस आयुक्त श्री संजय साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, व शिक्षणाधिकारी विजय सरकटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
या सभेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर ठाणे शहर, नवी मुंबई विभागाचे विभागीय समादेशक दिलीप स्वामी नाशिक विभाग पालघर ठाणे, विभागीय समादेशक मनिलाल शिंपी कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूरचे विभागीय समादेशक महादेव क्षीरसागर कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक अनंत किनगे, शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासन जवाहर बाल भवन नियमक मंडळ सदस्य प्रशांत भामरे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला , इंटर ॲडव्हाइस एज्युकेशन चे CEO श्री कामेन्द्र दाहट साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या कडून सर्व आरएसपी अधिकारी शिक्षक यांना पेन डायरी व रेनकोटचे वाटप करण्यात आले त्यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शिस्त व वाहतुकीचे नियम अवगत होणे अत्यंत गरजेचे आहे असे आपल्या भाषणातून सांगितले.
. कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट साहेब कल्याण पूर्व शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर साहेब कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे असिस्टंट इन्स्पेक्टर रोहित पवार, मोटरवाहन निरीक्षक श्री. सूर्यवंशी साहेब, आरएसपी प्रतिनिधी प्रसिद्धीप्रमुख व स्वराज्य तोरण चे पत्रकार डॉ.किशोर पाटील, विभागातील महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील सर्व आरएसपी अधिकारी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते सण 2024 -25 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश सत्र सभा शुभारंभ सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वारणा वातावरणात संपन्न झाली
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात झाली.
सिद्धार्थ माध्यमिक विद्यालय गाळेगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे या शाळेतील आर एस पी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व रस्ता सुरक्षा गीत सादर केले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अजित कांबळे सर यांचे सहकार्य लावले. विभागीय समादेशक श्री महादेव क्षीरसागर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विभागीय समादेशक मणिलाल शिंपी सर यांनी नागरी संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातील नागरिकांना, तरुणांना,वाहतुकीचे नियमन करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच गणेश उत्सव, नवरात्रोत्सव, आणि विशेष प्रसंगी पोलीस प्रशासनाचा मार्गदर्शनाखाली कर्तव्य करण्याची गरज आहे. विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांनी आजच्या काळात आर एस पी विषयाची अत्यंत गरज आहे तसेच आरएसपी अधिकारी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. आजच्या शहरी व ग्रामीण रस्ता वाहतुकीचा विचार करता सुरक्षा रस्ता सुरक्षा अभियान रस्ता वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करणे खूपच गरजेचे आहे असे मत व्यक्त केले
माननीय शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी आपल्या विभागामधील सर्व शाळांमध्ये हा विषय प्रभावीपणे राबवण्यासाठी उपस्थित शिक्षकांना विषयाबद्दलची माहिती सांगितली आणि चर्चासत्र,मेळावे, रस्ता सुरक्षा अभियानात वेळोवेळी विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घ्यावा अशा सूचना दिल्या. शाळेत पथक नोंदणी करणे, आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा भरवणे याबाबत सूचना करून सर्व मुख्याध्यापकांना सुचित केले जाईल असे सांगितले.
जिल्हा समादेशक अनंत किनगे यांनी आरएसपी विषय राबवण्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट व सचिन सांडभोर यांनी शहरांमध्ये रस्ता वाहतूक बाबत शिस्त लावण्याची अत्यंत गरज आहे. वाहनांच्या गर्दीमुळे वेळोवेळी समस्या निर्माण होतात या कामी आरएसपी अधिकारी टीमची खूप मदत होते
असे सांगितले.
शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कल्याण अध्यक्ष विलास जाधव, ठाणे जिल्हा विद्या सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक आमचे मित्र चंद्रशेखर बागुल या वेळी उपस्थित होते. आजच्या सत्र शुभारंभ सभेसाठी प्रशिक्षित व अप्रशिक्षित आरएसपी शिक्षक अधिकारी उपस्थित होते.
ही प्रवेश सत्र सभा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे,जिल्हा उपसमादेशक किरण वसईकर, आरएसपी अधिकारी मंगेश भामरे, विजय भामरे,बंशीलाल महाजन,शरद बोरसे, बाळकृष्ण जगे, भगवान परदेशी, चंद्रकांत ठाकूर, संजय भामरे, संतोष हंडाळ व सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचलन आरएसपी अधिकारी श्री विनोद शेलकर यांनी केले. किरण वसईकर यांनी उपस्थित मान्यवरांचे,प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थित सर्व प्रशिक्षित, अप्रशिक्षित आर एस पी अधिकारी शिक्षक यांचे यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची समारोप करण्यात आला.

