धनदाई महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
1 min read

धनदाई महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

धनदाई महाविद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अमळनेर: येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला काँग्रेस कमिटीच्या अंमळनेर शहराध्यक्षा ताईसो.प्रा. नयना पाटील मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील हे होते तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जि.प सदस्य,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष, प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील,सचिव राधेश्याम पांडुरंग पाटील, संचालक नंदकुमार पाटील, संचालक शैलेंद्र पाटील ,धनदाई कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ लिलाधर पाटील व जेष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नानासाहेब डी. डी पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती देत प्रत्येकाने वृक्षारोपण करावे,पर्यावरण संतुलन राखण्याचे सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत उद् बोधनात्मक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने झाली. नंतर सामूहिकरित्या तिरंगा प्रतिज्ञा घेतली. जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी ध्वजगीत म्हटले. नंतर शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे तसेच देशभक्तीपर गीते व नृत्य सादरीकरण केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा डॉ.शैलेश पाटील यांनी केले. यावेळी धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय ,आय टी आय कॉलेज ,जय योगेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच शांतनिकेतन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *