धरणगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
धरणगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – दि. १२/१३ ऑगस्ट रोजी धरणगाव तालुकास्तरीय १४/१७/१९ वर्ष गटातील मुला मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन धरणगाव येथील हिरा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन हिरा इंटरनॅशनल स्कूलचे उपाध्यक्ष श्री नितीनजी नगरीया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या म्हणून या शाळेच्या व्यवस्थापिका आदरणीय लतिका मैशरी मॅडम या होत्या. त्यांनी उपस्थित खेळाडूंना आपल्या भाषणात मुलांनी खिलाडूवृत्ती कसी जपावी या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. तर स्पर्धेत सहभागी खेळाडूंना म.फुले हायस्कूल चे माजी क्रिडा शिक्षक श्री व्ही पी महाले सर यांनी विद्यार्थ्यांना व पंचांना शपथ दिली स्पर्धेविषयी सविस्तर मार्गदर्शन व आँनलाईन कागदपत्रांच्या संदर्भात माहिती क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर यांनी दिली.
पंच म्हणून अमोल सोनार, राकेश धनगर सर, संदेश शिरसाट सर, रोहित सपकाळे, गिरीश माळी,. शुभम भोई सर यांनी कार्य केले तर स्पर्धा पार पाडण्यासाठी डी एन पाटील सर, श्री वाय ए पाटील सर, डी एच कोळी सर, जितेंद्र ओस्तवाल सर जगन गावीत सर, कायंदे सर सिनियर काॅलेजचे फीजिकल डायरेक्टर दिपक पाटील सर तसेच तालुक्यांतील सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले या स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्हास्तरावर खेळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सूत्रसंचालन आर बी महाले सर यांनी केले तर आभार के एस पाटील सर यांनी मानले. स्पर्धांचे आयोजन पप्पूभाऊ सोनवणी हिरा इंटरनॅशनल स्कूल चे क्रीडा शिक्षक श्री निलेश पाटील, सर निथिलेश चौधरी सर, गणेश चव्हाण, पूनम वाघरे यांच्या सहकार्याने अत्यंत खेळीमेडीच्या वातावरणात पार पडल्या

