सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
1 min read

सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…

Loading

सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती जळगाव तर्फे, अपंग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी सुरेश सोनवणे, अरुण संधान (पंचायत समिती जळगाव )यांच्या उपस्थितीत इयत्ता आठवीचा विद्यार्थी मोहन सुतार या पायाने अधू असलेल्या विद्यार्थ्यास व्हीलचेअर व कु. सारिका रवींद्र वानखेडे या विद्यार्थिनी कर्णयंत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील यांनी तर आभार स्वाती वाघुळदे यांनी मानले.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. डॉ. मिलिंद बागुल सर ,पर्यवेक्षक श्री एल.जे. पाटील सर ,विद्यार्थ्यांचे पालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *