संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान
![]()
संतोष मेढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
शिक्षण संचालक यांच्या हस्ते होणार सन्मान
मुंबई (प्रतिनिधी) भांडुप मेडिकोस कम्युनिटी वेलफेअर सोसायटीतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार भांडुप मधील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संतोष मेढे यांना जाहीर झाला आहे
राज्याचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी भांडुपमधील पराग हायस्कुलच्या सभागृहात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन संतोष मेढे यांचा सन्मान केला जाणार आहे
इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे संतोष मेढे हे उपक्रमशील शिक्षक असून अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रम घेत असतात. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी यासाठी ते विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे वर्ग घेत असतात. यासोबतच गायनातून कविता वाचन, अभिवाचन करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करीत असतात. यासोबतच समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून मदत करीत असतात.
त्यांना घोषित झालेल्या पुरस्काराबद्दल भांडुप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वंदना पेडणेकर व शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोरनारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

