देवगांव देवळी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
अमळनेर प्रतिनिधी

देवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिवस व संपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
गावातील ग्रामस्थ मंडळाचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी संचालन केले…
देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांनी शाळेचे ध्वजारोहण केले..
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी ध्वजगीत, राज्य गीत व प्रतिज्ञा सादर केली…
यावेळी महात्मा फुले हायस्कूल चे संचालक मंडळ,देवगाव देवळी येथील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच माजी सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, व देवगाव देवळी येथील विविध क्षेत्रातील मान्यवर,
शिक्षण प्रेमी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले.



