लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन
1 min read

लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन

Loading

लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन

अमळनेर: शासनाच्या “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालय-झामी चौक-कुंठे रोड-तिरंगा चौक-लोकमान्य विद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून भारत माता की जय आणि वंदेमातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *