विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्न
![]()
विद्येश्वर महादेव मंदिराची कावळ यात्रा उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.11-8-2024 रविवार रोजी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न झाली असून सकाळी अकरा वाजता तापी नदीतून कावळ भरून संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अमळनेर येथे शिवभक्त दाखल झाले होते जळोद येथे अनिल साळुंखे, चंद्रशेखर साळुंखे यांच्या कडून शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती कावळ यात्रेत रवि पाटील, सुनिल शिंगाणे, संजय पाटील, अशोक साळुंखे, देसाई बापू, विवेक तेले, सुभाष चव्हाण, डॉ.नरेंद्र गुजर, अनिल शिंगाणे, विकास महाजन, कल्पेश साळुंखे, भगीरथ पाटील, मोहित पवार, विवेक पाटील, प्रविण वाघ, सनी पाटील, मुन्ना पाटील, भावेश पाटील तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


