अमळनेर तालुक्यात खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात…
![]()
खानदेशाची आराध्य दैवत कानबाई मातचे विसर्जन…
अमळनेर तालुक्यात कानबाई मातेचे विसर्जन उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
श्रावण महिन्यातील पहिला शनिवार व रविवारी खान्देशची आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. कानबाईचे रोट खाल्यानंतर कानबाईचे आज विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरातील व ग्रामीण भागातील महिला बंधू-भगिनींनी वाजत गाजत मिरवणूक काळत आनंद उत्सव साजरा केला.. यावर्षी वरूण राजाची चांगली कृपा असल्याने शेतकरी सुखावला आहे.संपूर्ण खान्देश प्रांताची कुलदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाणाऱ्या कानबाई मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला.प्राचीन काळापासून सुरू असलेला कानुबाईचा उत्सव वर्षानुवर्षे परंपरेनुसार चालत आलेला आहे.तो सण अमळनेर तालुक्यातील शहरात व ग्रामीण भागात उत्साहात साजरा झाला.
दरवर्षीप्रमाणे अमळनेरला सामाजिक कार्यकर्ते व अमळनेर आगाराचे वाहक राजु (बापु) चौधरी यांच्या घरी कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केला जातो.यावर्षी ही मोठ्या उत्साहात संपन्न झाला..यावेळी बाहेरपुरा परिसरातील तरुण तरुणी महिला पुरुष ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने कानुबाई माता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. सामाजिक,धार्मिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कानुबाई मातेचा आशीर्वाद घेतला…
अमळनेर तालुक्यात व शहरात कानमातेचा विसर्जन सोहळा शांततेमध्ये उत्साहात पार पडला… लहानापासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी विसर्जनाचा आनंद घेतला…

