अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदी जोड प्रकल्पाला मान्यता द्या  डांगर येथील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
1 min read

अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदी जोड प्रकल्पाला मान्यता द्या डांगर येथील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Loading

अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदी जोड प्रकल्पाला मान्यता द्या

डांगर येथील शेतकऱ्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात आहे या क्षेत्रातील गावात उन्हाळ्यात कायम पिण्यासाठी शासन टँकरद्वारे पाणीपुरवीत असते या परिसरातील डांगर या गावात पाण्याची कायम टंचाईे असते.
प्रत्यक्षात येथूनच माळण नदीचा देखील उगम असून ही नदी पुढे बोरी नदीला जाऊन मिळते ..साधारण २० ते २२ गाव माळण नदी काठी वसले आहेत ..डांगर पासून साधारण आठ किलोमीटरवर पांझरा नदी वाहत असून पांझरा नदीचे पाणी डांगर येथील पांझर तलावात टाकल्यास माळण नदी निश्चितपणे प्रवाहित होऊ शकते..
त्याचा फायदा पश्चिम भागातील साधारण 50 ते 60 गावांना होऊन पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची देखील समस्या सुटू शकते ..पाडळसरे धरण जरी पूर्ण झाले तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या भागाचा समावेश नसल्याने त्याचा फायदा या भागाला होणार नाही ..यामुळे या क्षेत्रातील गावांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पांझरा माळणजोड प्रकल्पाचा विचार व्हावा ही डांगर येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेरला शेतकरी संवाद यात्रेत आले असता डांगर येथील लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ, शेतकरी राजेश वाघ,उपसरपंच राकेश पाटील , जितेंद्र पाटील, किशोर वाघ, महेश पाटील, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील ,रवींद्र पाटील, डॉक्टर एकनाथ पाटील, राजेंद्र खैरनार ,रोहिदास पाटील ,गोरख पाटील ,वासुदेव पाटील, भटू पाटील, प्रवीण पाटील, मुकेश पाटील सह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *