*अनेक वृत्तपत्र गेलेत आणि आलेत पण लेखन मंच स्पर्धेच्या युगात आजही उभा आहे -जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले* *’लेखन मंच ‘वर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव*
![]()
*इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगात प्रिंट मीडिया टिकून त्याचे जिवंत उदाहरण लेखन मंच -मंत्री अनिलदादा पाटील*
*अनेक वृत्तपत्र गेलेत आणि आलेत पण लेखन मंच स्पर्धेच्या युगात आजही उभा आहे -जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले*
*’लेखन मंच ‘वर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव*
लेखन मंच न्यूज नेटवर्क अमळनेर: अल्पावधीतच आपल्या सर्व वाचकांचे लोकप्रिय साप्ताहिक ‘लेखन मंच च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडकर सभागृह येथे आयोजित सोहळ्यास तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. ४ था वर्धापनदिनी मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते वर्धापन दिन विशेषांकाने प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा व्हाईस ऑफ मिडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ .डिंगबर महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा काॅग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रावसो. के. डी पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील ,माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे, माजी केंद्रप्रमुख धनगर आण्णा ,पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.मंचावरील सर्व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.लेखन मंच ला शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाची सुरूवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलनाने करण्यात आली . अध्यक्षीय भाषणात डॉ .डिंगबर महाले म्हणाले की, आज असंख्य न्यूज वेब पोर्टल निघाली आहेत.तसेच साप्ताहिक, दैनिक वृत्तपत्र भरपूर आहेत. पत्रकारिता क्षेत्रात आज स्पर्धा सुरू आहे.अनेक वृत्तपत्र गेलेत आणि आलेत पण ‘ लेखन मंच’ स्पर्धेच्या युगात आजही उभा आहे.’लेखन मंच’ ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली असून ४ था वर्धापन दिन दिमाखात साजरा करून ‘लेखन मंच’ ने विजयाचा चौकार मारला आहे. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस तथा वक्ता सेल जिल्हाप्रमुख मा.संदीप घोरपडे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के सुर्यवंशी,अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन रणजीत शिंदे,प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) शहराध्यक्ष श्याम पाटील,पोलीस निरीक्षक विकास देवरे, कनिष्ठ अभियंता श्रीकांत चिखलोदकर यांची उपस्थिती होती.तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजित सोनवणे, सचिव सुधीर महाजन, जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस वर्षाताई अहिरराव, तालुकाध्यक्ष शैला बैसाणे, माध्यमिक चे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिसोदे, प्राथमिक चे बापूराव ठाकरे,संपादिका सौ.पुनम ठाकरे,प्रा. डॉ. राहुल निकम, ॲड.तिलोत्तमा पाटील, प्रा.डाॅ. लिलाधर पाटील, विजयसिंह पवार, गिरीश पाटील,मंगलाताई सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे प्रा.संजय महाजन ,चिंधू वानखेडे, ह्रुदयनाथ मोरे, अतुल डोळस, कासार सर , राठोड सर, महेश पाटील, सोनवणे तसेच पत्रकार उमेश धनराळे ,जयेश काटे, ईश्वर महाजन, संजय सुर्यवंशी, जितेंद्र पाटील, संभाजी देवरे, उमाकांत ठाकूर, हितेंद्र बडगुजर, भुषण माळी आदी पत्रकार तसेच डी . ए सोनवणे, यशवंत सूर्यवंशी, चंद्रकांत बि-हाडे (प्लॅटो टेलर्स). डी. ए सोनवणे, श्रीकांत बि-हाडे राहुल बि-हाडे, महाजन सर यासह समस्त वृत्तपत्राचे कार्यक्रमाची शोभा वाढवणारे राजकीय नेते अधिकारी गण व मित्रपरिवार, पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लेखन मंच’ चे उपसंपादक सोपान भवरे सर यांनी केले.सूत्रसंचालन किरण चव्हाण सर यांनी केले.तर आभार ‘लेखन मंच’ चे कार्य.संपादक अजय भामरे सर यांनी मानले.
सहसंपादक मिलिंद निकम, साहित्यिक, कथाकार तथा लेखन चे अतिथी संपादक गोकुळ बागुल, भाऊसाहेब देशमुख सर यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
चौकट
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले साप्ताहिक ‘लेखन मंच’ च्या ४ था वर्धापन दिन विशेषांकाचे मा .ना.श्री अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मंत्री महोदय यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगात प्रिंट मीडिया टिकून त्याचे जिवंत उदाहरण लेखन मंच आहे. यापुढेही लेखन मंच ची वाटचाल अशीच सुरू राहो, साप्ताहिक लेखन मंच हे वृत्तपत्र बहरत राहो.अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

