“जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन “निमित्त शाळेला ग्रंथ भेट !….  सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांचा उपक्रम !….
1 min read

“जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन “निमित्त शाळेला ग्रंथ भेट !…. सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांचा उपक्रम !….

Loading

“जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन “निमित्त शाळेला ग्रंथ भेट !….

सत्यशोधक पुस्तक चळवळ, धरणगाव यांचा उपक्रम !….

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे “जागतिक आदिवासी दिन ” व “क्रांती दिन ” याचे औचित्य साधून सत्यशोधक पुस्तक चळवळ धरणगाव चे संस्थापक अध्यक्ष व महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपक्रमशिल शिक्षक पी डी पाटील यांच्याकडून शाळेच्या ग्रंथालयाला आदिवासी जननायक उमाजी नाईक, तंट्या मामा भिल, वीर एकलव्य व आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचे छोटे जीवन चरित्र भेट देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व ग्रंथपाल गोपाल पंढरीनाथ महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *