अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा
![]()
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ०९/०८/२४ रोजी जागतीक आदिवासी दिवस व क्रांती दिवस उत्स्फूर्त प्रतिसादात आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. निरन चव्हाण यांनी जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिनाविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी आदिवासी पेहरावात आदिवासी संस्कृतीपर नृत्य सादर करून आदिवासी चालीरितींवर प्रकाश टाकला. यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी “आदिवासी सन्मान ” या नावाची नाटीका सादर केली. यावेळी खुशाल जगदीश पाटील, सिध्दी मगरे, स्नेहा गोस्वामी या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनपट रंगवून, धाडसीवृत्ती तसेच कर्तुत्वाबद्दल भाषण केले. यावेळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम पार पाडण्यास महत्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. नयना पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे व जल्लोषात पार पडला.

