११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न
![]()
*रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न झाली =================== *”न भूतो न भविष्य” आशा सांगलीतील ओबीसी मेळाव्यास हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन := ओबीसी समन्वयक नेते मा तुकाराम माळी*
===========================
*सांगली जत :- प्रतिनिधि*
*रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी तरुण भारत स्टेडियम सागली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी, ओबीसी नेते राज्याचे वरिष्ठ मंत्री मा.ना.छगनराव भुजबळसाहेब, आमदार गोपीचंद पडोळकर, आमदार पंकजाताई मुढे, लक्ष्मणराव हाक्के, मा.आमदार प्रकाश आण्णा शेडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत* *ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा सांगली जिल्ह्यातील ओबीसी, व्ही.जे.एन.टी.एन.टी.अनुसूचित जाती, जमाती बाधववाकडून आयोजित केला असून त्यासाठी जत तालुक्यातून ओबीसी,व्हीजेएनटी, एनटी,अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक बाधवाची मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत सरदार पाटील, तुकाराम माळी, राजेंद्र कोळेकर सलीम गवंडी,जालिंदर* *व,हणमाने,हिंदुराव शेडगे, माणिकराव वाघमोडे,उत्तम म्हारणूर, एकनाथ बंडगर, प्रदीप करगणीकर,तायाप्पा वाघमोडे,परशुराम मोरे, नागनाथ मोटे,निलेश बामणे,सलीम पाच्छापूरे,नाथाजी पाटील, दिनेश जाधव,राजू इनामदार, रफिक नगारजी,रमेश माळी(को.बो.)गोपाळराव पाथरूट, संतोष मोठे,गंगाधर देवकते,मल्लिकार्जुन औरसंगे,रमेश माळी,अनिल मिसाळ,सुनील माळी, बंडू डोबाळे,हाजीसाहेब हुजरे,श्रीधर वाघमारे,संजय साळूखे,दिल्लीप बिराजदार आदीनी भाग घेऊन चर्चा करून नियोजन केले.जत तालुक्यातील सर्व गावातील वाहन संख्या, वाहन मार्ग,वाहन जबाबदारी यांचे नियोजन करून सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी राजेंद्र कोळेकर यांनी स्वीकारली असून*
*जत तालुक्यातून ओबीसी आरक्षण एल्गार महामेळाव्यासाठी मोठ्यासंख्यने उपस्थिती राखण्याकरिता गावोगावी जाऊन संपर्क साधून ओबीसी आरक्षण संबंधित सर्व माहिती समजावून सांगून जागृत समाज निर्माण केली असून तसेच तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन रविवार दिनांक ११ आगस्ट रोजी तरुण भारत स्टेडियम सांगली येथील ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यास उपस्थिती मोठ्य प्रमाणात राहून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे म्हणून बैठकीत आवाहन करण्यात आले*.

