मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा
![]()
मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा असतो
असोदा – सार्वजनिक विद्यालयात सुरू असलेल्या साने गुरुजी कथामलेत एल जे भुगवड्या यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की,मुलांना घडविण्यात, त्यांना संस्कारक्षम बनविण्यास,त्यांच्या पंखांना बळ देण्यात आईचा खूप मोठा वाटा असतो.एक आईच अशी असते की जी आपल्या मुलांचे भविष्य उत्तमरीत्या घडवू शकते.याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, एल जे भुगवड्या यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.जागृती भालेराव या विद्यार्थिनीने तिच्या बोधकथेतून विद्यार्थ्यांना विना कष्ट करता केलेले काम कधीच फायदेशीर नसते हे पटवून दिले.

