धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे. अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना निवेदन
![]()
धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे.
अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना निवेदन
अमळनेर येथील अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनगर समाजाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्याचा शब्द दिला.
महाराष्ट्र शासनाने धनगर समाजासाठी एक हजार कोटीच्या योजनांची घोषणा केली आहे परंतु त्या अंतर्गत तालुक्यातील एकाही पात्र लाभार्थ्याला आजपर्यंत लाभ मिळाला नाही. त्यामुळे धनगर समाजातील गरीब व गरजू पात्र लाभार्थी वंचित राहिले आहेत. लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शिष्टमंडळाने पुढाकार घेऊन चर्चा केली. बेघर, व गरजू लोकांना दिलासा दिला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत घरकुल योजना व मोदी आवास योजना तसेच धनगर समाजात जाहीर झालेल्या एक हजार कोटीच्या योजना अंतर्गत असलेली घरकुल योजना यांची अंमलबजावणी करून धनगर लोकवस्तीच्या गावांमध्ये त्वरित लाभ मिळवून द्यावा अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष देवा भाऊ लांडगे, निंभोरा उपसरपंच आलेश धनगर, करणखेडा सरपंच गुलाबराव भागवत, माजी सरपंच सुधाकर पवार, बोहरा ग्रामपंचायत सदस्य निखिल धनगर, सौरव भागवत, राहुल धनगर आदी समाज बांधव उपस्थित होते.
तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार काही गावांमध्ये वितरित झाले नाहीत त्या गावांमध्ये वितरणाची अंमलबजावणी लवकर करावी अशी मागणी देखील करण्यात आली. धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांनी लवकर कागदपत्रांची पूर्तता करून आपली घरकुल संबंधी मागणी करावी असे आवाहन शिष्टमंडळाने केले आहे.

