बोरखेडे खु।। ता. यावल जि.प. मराठी मुलांची शाळेत शिक्षण सप्ताहाची सांगता
1 min read

बोरखेडे खु।। ता. यावल जि.प. मराठी मुलांची शाळेत शिक्षण सप्ताहाची सांगता

Loading

बोरखेडे खु।। ता. यावल जि.प. मराठी मुलांची शाळेत शिक्षण सप्ताहाची सांगता

अमळनेर प्रतिनिधी
जि. प. मराठी मुलांची शाळा बोरखेडे खु॥ शाळेत शिक्षण सप्ताह‌ा‌चे आयोजन करून गोड स्नेह भोजनाने सप्तहाची सांगता करण्यात आली.
याबाबत सविस्तर-वृत्त असे की दि-22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शिक्षक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असता
या अंतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत सख्या ज्ञान व साक्षरता दिवस, क्रिडा दिवस ,सांस्कृतिक दिवस् कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, इको क्लब दिवस ,शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस या उपक्रम दिवस नुसार भिंती पत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, तरंगचित्र ,गणितीय परिपाठ, कथाकथन, खेळाचे महत्व खेळ व व्यायाम, नृत्य गायन ,नाटके, लावणी नृत्य, माती काम कार्यशाळा वृक्षारोपण पोषण आहार इको क्लबची स्थापना इत्यादी उपक्रम राबवून गावात प्रभात फेरी काढून जन‌जागृती करण्यात आली दि.28 जुलै रोजी शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी शा.व्य.समितीचे अध्यक्ष फकीरा सुपडू तडवी व सदस्य यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक – राजेंद्र सोनवणे, शिक्षक रज्जाक तडवी, अजय बाविस्कर, हुसेन तडवी जितेंद्र बावा ,अजित तडवी सर ,विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठया संखेने उपस्थित होते या शिक्षण सप्ताह मुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता तर विविध विषयांवर ज्ञान प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *