देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने क्रिडा स्पर्धा
1 min read

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने क्रिडा स्पर्धा

Loading

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह निमित्ताने क्रिडा स्पर्धा

अमळनेर प्रतिनिधी-राज्यात २२ जुलै ते २८ जुलै शिक्षण सप्ताह निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची व सांघिक भावना वाढीस लावणे यामागील उद्देश आहे. याची औचित्य साधत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव देवळी येथे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या
यावेळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले.. देशी खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी माहिती दिली..
देवगाव देवळी येथील आठवी, नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी कबड्डी, लंगडी खेळामध्ये सहभाग नोंदवला.. कबड्डी.व लंगडी खेळामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आठवी व दहावीच्या विद्यार्थिनींना हरवत विजय मिळवला.
यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन ,एच.ओ माळी, एस के महाजन, अरविंद सोनटक्के यांनी खेळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *