लोकमान्य विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा
![]()
लोकमान्य विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा
अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणे सादर केलीत व गुरूंचे महत्व सांगितले. यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थान मार्फत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, तसेच संस्थेचे प्रा.डाॅ.प्र.ज जोशी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जे.के.चौधरी हे सुद्धा मंचावर विराजमान होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सायली देशपांडे यांनी तर आभारप्रदर्शन जे.के.चौधरी यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

