मा.आमदार शिरीष दादांच्या प्रयत्नाने नागरिकांची होणारी पाणीपट्टी २% शास्तीची लूट थांबणार
![]()
शिरीष दादांच्या प्रयत्नाने नागरिकांची होणारी पाणीपट्टी २% शास्तीची लूट थांबणार
मुख्यमंत्र्यांचे नगरविकास प्रधान सचिवांना तात्काळ तपासून सादर करण्याचे निर्देश
अमळनेर प्रतिनिधी -येथील न पा पाणीपट्टीच्या २% शास्तीच्या नावाखाली होत असलेली वसुली त्वरित थांबवावी करीता माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र दिले असता सदर बाबीची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री यांनी दिले आदेश.
सविस्तर वृत्त असे की,अमळनेर तालुक्यात मागील वर्षी झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे नागरीक हवालदिल झाले आहेत.शासनाने एका बाजुला विद्यार्थी फि माफी,शेतकरी पिक कर्ज पुनर्गठन करणे करिता निर्णय घेतला आहे.परंतु अमळनेर नगरपरिषदेने न.पा.अधिनीयम १९६५ अंतर्गत कलम १५० अ नुसार पाणीपट्टी कर थकबाकीवर २% शास्ती च्या नावावर वसुली करीत आहे.
सदर नियमाची अमलबजावणी करने हा नगरपरिषदेचा ऐच्छीक विषय असतांना नगरपरिषिद अश्या भयावह परिस्थितीत सक्तीची वसुली का करीत आहे हा संशोधनाचा विषय आहे.
या निर्णयाच्या विरोधात नगरसेवकांनी आंदोलन करून सदर वसुली बंद केली होती,परंतु पुन्हा नगर
परिषदेने वसली सरु केली आहे.शास्ती ही शासना मार्फेत पुरवण्यात आलेल्या साफ्टवेअर माध्यमातून आकारण्यात येत असल्याचे न पा प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. म्हणजे नगरपरिषद एक प्रकारे शासनाचा आदेशान्वये वसुली करित असल्याचे दर्शवीत आहे.यामुळे सरकार बद्दल ची नागरिकांची भूमिका मलिन होत आहे.सरकार विरोधात जनमत होत आहे.तरी सदर वसुली तात्काळ स्थगित करावी, अश्या आशयाचे पत्र माजी आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे अभ्यासू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन नागरिकांची होत असलेली लूट लक्षात आणून दिली असता नगर विकास प्रधान सचिव यांना याबाबत त्वरित चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालय कडून देण्यात आल्याने अमळनेरकरांची होत असलेली लूट थांबणार असल्याचे प्राथमिक दर्शी दिसत आहे.असे झाल्यास येत्या विधानसभेला शिरीष चौधरी यांचे पारडे जड झाल्या शिवाय राहणार नाही.

