सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू
![]()
सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आजपासून साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल.जे.पाटील,बोधपर मार्गदर्शक के.बी. तायडे, शुभांगिनी महाजन यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता दहावीच्या रिया पाटील व तृप्ती बिऱ्हाडे या दोन विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बोधपर कथा सांगितली. के.बी. तायडे सर यांनी विद्यार्थ्यांना माणसाची शरीराची स्वच्छताच महत्त्वाची नाही तर मनाचीही स्वच्छता आवश्यक आहे असे त्यांच्या बोधपर मार्गदर्शनातून सांगितले.मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल सर यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांना चांगल्या विचारांची व मार्गदर्शनाची गरज आहे असे आपल्या वक्तव्यातून सांगितले. कथामालेस उपस्थित शुभांगिनी महाजन यांनी आपल्या वक्तव्यातून विद्यार्थ्यांना जर चांगले विचार मिळाले तर त्यांचे उज्वल भविष्य घडू शकते असे सांगितले. कथामालेचे आयोजन विभाग प्रमुख भावना महाजन यांनी सूत्रसंचालन केले

