दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम
1 min read

दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम

Loading

दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत ६ रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी श्री.अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अमळनेरचे सूपुत्र नागपुरचे आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उप वन संरक्षक ए.प्रवीण यांची प्रमूख उपस्थिती होती. प्रसाद यांनी अंबरीष ऋषी टेकडीला संरक्षीत वन क्षेत्र जाहीर व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह मंगळग्रह सेवा संस्था, महसुल विभाग, वनविभाग,संत सखाराम महाराज संस्थान, महिला हाऊसिंग ट्रस्ट, महाराष्ट्र मंडळ अबु धाबी-दुबई, रोटरी क्लब, लायन्स क्लब, अमळनेर महिला मंच ट्रस्ट, फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना, मारवड विकास मंच, ओम शांती परिवार, पतंजली योग समिती आदी सामाजिक संस्थांतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी शामकांत देसले, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपील पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्रेहा पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हारचे मुख्य अभिंयंता विजय भदाणे, कंमांडट सुभेदार मेजर नागराज पाटील, प्रांताधिकारी महादेव खेडकर, मुख्याधिकारी तुषार नेरकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवृत्त प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी,डॉ बी.एस.पाटील, बजरंगलाल अग्रवाल, डॉ. विक्रांत पाटील,डॉ. अपर्णा मुठे,मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सह सचिव दिलीप बहीरम ,खजिनदार गिरीश कुलकर्णी, प्रकाश मेखा, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, बजरंग अग्रवाल, डी.ए. धनगर, उद्योजक विनोद पाटील,धनदाई कॉलेजचे प्रा.के. डी. पाटील, महेश कोठावदे,जळगाव जनता सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, महेश कोठावदे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडे, प्रसाद शर्मा, वसुंधरा लांडगे, माधूरी पाटील,करुणा सोनार,अपेक्षा पवार ,पराग पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जळगाव जनता बँक व सौरभ अ‍ॅक्वा यांनी पाण्याचे जार दिले तर काही दातांनी गोळ्या बिस्कीट गुप्त दान केले. संजय बाविस्कर यांच्याकडून सर्वांना केळी वाटप करण्यात आले. पालिकेच्या सफाई कामगारांनी जागेची साफसफाई केली. सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले यांनी केले. आशिष चौधरी यांनी आभार मानले.

उपक्रमात यांचा होता सहभाग

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अ‍ॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, साने गुरुजी कन्या हायस्कूल, सावित्री बाई फुले कन्या हायस्कूल, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, लोकमान्य विद्यालय, बोहरा पब्लिक स्कूल, पद्मावती नारायण मुंदडा माध्यमिक विद्यालय, शांती निकेतन विद्यालय, न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल , राजश्री शाहू विद्यालय, गायकवाड हायस्कूल, आश्रम शाळा, लोकमान्य विद्यालय, जी. एस. हायस्कूल, बी. पी . इंग्लिश मीडियम, द्रौ. रा. कन्या शाळा, विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, गायकवाड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इंदिरा गांधी हायस्कूल, प्रताप कॉलेज, एनसीसी, एनएसएस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.

कोट

जिल्हाधिकाऱ्यांनी वन क्षेत्रासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. पुढील वर्षी तालुक्यातील सर्वच टेकडींवर एकाचवेळी एका मिनिटात असंख्य वृक्षांची लागवड करुन वर्ल्ड रेकॉर्ड करू
-संदीपकुमार साळुंखे, आयकर आयुक्त नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *