डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..
![]()
डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
भुसावळ प्रतिनिधी:- भुसावळ नगर परिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक , शॉर्ट पिच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व विविध खेळांच्या राज्य व जिल्हा संघटनांचे सचिव डॉ प्रदीप रवींद्र साखरे यांना नाशिक येथे त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानी२०१४पासुन सतत सात वर्षे स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी , व मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत ८मार्च महिला दिनी ज्या बालिका जन्माला येतात त्या बालिकांचा व मातापित्यांचा बेबी किट शॉल श्रीफळ खान नारळाचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येते. तसेच निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस तीच्या ४थ्या वाढदिवसा पासून ते ११व्या वाढदिवसा प्रयत्न तीचा जो वाढदिवस असेल तितके वृक्ष लावून साजरा करण्यात येतो. तसेच गरिबांना अन्नदान करतात , गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले, गरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले. तसेच जिल्हा राज्य व राष्ट्रीय क्रीडा संघटनांचे विविध पदावर करत असलेले कार्य व विविध राज्य , राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धांचे केलेले आयोजन, व ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया द्वारे घेण्यात आलेल्या बीच एशियनगेम्स मध्ये भारतीय संघात प्रतिनिधित्व केले तसेच 2009 मध्ये व्हिएतनाम येथे इंडोअर एशियन गेम व ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया द्वारे चायना, थायलंड, व्हिएतनाम , येथे घेण्यात आलेले बीच एशियन गेम्स , व बँकॉक , सुभानपुरी, फुकेट थायलंड ,बाली- इंडोनेशिया, लावोस , मलेशिया , चायना , अश्या विविध देशांमध्ये एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भारतीय पेटांक्यू संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले. २००३ला पोखरा नेपाळ येथे झालेल्या सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले व भारतीय संघाला गोल्ड मेडल प्राप्त झाले. शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले, शालेय राज्य स्पर्धेत निवड समिती सदस्य म्हणून काम केले. अश्या विविध कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच यांच्या द्वारा आमदार सीमा हिरे , मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ऑड. नितीन ठाकरे, नाशिक जिल्हा शिवसेना अध्यक्ष सुधाकर बडगुजर व भारतीय मारवाडी गुजराती मंचाचे अध्यक्ष डॉ. अजित हुकुमचंद बागमार यांच्या हस्ते नाशिक येथील पद्मश्री दादासाहेब गायकवाड सभागृह येथे एम.जी.एम तर्फे आंतरराष्ट्रीय स्तराचा आंतरराष्ट्रीय खेळ सामाजिक समाजभूषण सन्मान देऊन गौरविण्यात आले.

