जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप
1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप

Loading

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप

अमळनेर प्रतिनिधी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे अमळनेर येथिल कोमल मेडीकल स्टोअर्सचे संचालक श्री. भरतभाई यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन्सिल व खोडरबर वाटप केले.. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश महाजन यांनी केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने आजचा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला…
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले . भगवान पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खूप मोठा आहे.. तो आपण विकत घेऊ शकत नाही .विद्यार्थ्यांना देण्यासाठी सामाजिक बांधिलकी असावी लागते अशी सामाजिक बांधिलकी कोमल मेडिकल ट्रस्टने केल्याबद्दल मनस्वी धन्यवाद व्यक्त केले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शिक्षक शशिकांत गोसावी,सौ सुरेखा पवार ,किरण पाटील यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *