यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती
![]()
यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर आपण आपले ध्येय गाठू शकतो..हे यशपाल पवार ने सिद्ध करून दाखवले आहे.. त्याच्या विषयाबद्दल अमळनेर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे..
साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्याचे व साऱ्या कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन . त्याला ९वी , १०वी त असतांनाच आम्ही गुरुजनांनी त्याच्याकडून वयाच्या 24 – 25 वीत आम्हाला तुला Class -1 अधिकारी म्हणून पहावयास आवडेल असे सांगितले होते ते त्याने आमची गुरु – दक्षिणा म्हणून पूर्ण केले त्याबद्दल यशपाल बेटा आम्हा सर्वांना तुझा सार्थ अभिमान आहे .असे
सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचीव संदीप घोरपडे, संचालक मंडळ व
सानेगुरुजी नुतन शाळेचे व कन्या शाळेच्या मुख्याध्यापक,सुनील पाटील, श्रीमती अनिता बोरसे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख ,शिक्षक कर्मचारी व साने गुरुजी परिवार , साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर,
पटवारी कॉलनी परिवाराच्या वतीने तुझे व आदरणीय पालकांचे , कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

