मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम
![]()
मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा ,प्राथमिक चाचणी शिबिर यशस्वी
मंगळग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चा स्तुत्य उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता लक्षात घेऊन येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि., जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ३ जुलै रोजी खानदेशस्तरीय एकदिवसीय मोफत खानदेश रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास युवा-युवतींसह नव्याने उद्योग तथा व्यवसायाची कवाडे उघडू पाहणा-यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतीलही काहींनी सहभाग नोंदविला.
रोजगार मेळाव्यातील प्रथम सत्रात सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले या दाम्पत्याने नोकरी मिळविण्यासह उद्योग तथा व्यवसायाची नेटकेपणाने उभारणी करण्यासाठी उमेदवारांना कोणकोणती कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे? आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व किती आहे? नोकरी कशी मिळवायची? नोकरी मिळाल्यावर ती कशी टिकवायची? प्रत्येक क्षेत्रात महिलांचे वाढलेले योगदान याबाबत वेळोवेळी उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात जळगावातील जैन उद्योग समूहाचे सीएसआर मॅनेजर गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मुलाखत तंत्राविषयी सखोल मार्गदर्शन केले. ‘मॉक इंटरव्यूव्ह’च्या माध्यमातून मुलाखतीदरम्यान होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याविषयीही मार्गदर्शन केले. मल्टी मीडिया फीचर्स प्रा.लि.चे संस्थापक तथा सीईओ सुशील नवाल यांनीही या मुलाखतीदरम्यान होणाऱ्या चुका लक्षात आणून देल्या. त्या कशा टाळता येतील याबाबत मार्गदर्शन केले.
![]()
![]()


